संस्थापिका
अहमदनगर अपंग कल्याणकारी मंडळाच्या आणि पर्यायाने जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा, कै. डॉ. कलाताई जोशी. कर्ण बधिरांच्या मूकपणातील वेदना त्यांना जाणवली. त्या वेदनेचे स्फुलिंग तयार झालं. त्यातून साकारलं, “जानकीबाई आपटे मूक बधीर विद्यालय”, अहमदनगर जिल्ह्यातली पहिली कर्ण बधीरांसाठीची शाळा. १९७७ च्या विजया दशमीला, ऑक्टोबर महिन्यात, दोन विदयार्थ्यांसह शाळेला सुरवात झाली. ना पैशाचं पाठबळ, ना कोण्या राजकीय अथवा सामाजिक पुढाऱ्यांचा वरद हस्त. पण, गेल्या २२ वर्षात शाळा सर्वांगानं विकसित झाली ती कलाताईंच साहस, चिकाटी आणि त्यांचा मानव शक्ती वरचा दुर्दम्य विश्वास यामुळे ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हे आमच्या संस्थेचं बोध वाक्य आहे. कलाताई आधी कामाला लागायच्या. त्यांचं काम,तळमळ, प्रामाणिकपणा पाहून समाजाचा सर्व प्रकारच्या मदतीचा ओघ सुरु व्हायचा. कलाताईंनी पाया रचून दिला आहे. आता अवकाश गवसणारे विद्यार्थी त्यातून झेप घ्यायला तयार करायचे आहेत. वाटचाल कठीण आहे, पण कलाताईंनी मार्ग दाखवून दिला आहे. त्या मार्गावरून वाटचाल करणं आमचं काम. दानशूर समाज आत्ता पर्यंत पाठीशी उभा आहे. यापुढेही तो तसाच उभा राहील असं काम आमच्या हातुन होईल हे आश्वासनं देतो.

वाटचालीतून गवसली उद्दिष्ट्ट्ये
- मूक बधिर विद्यार्थ्यांचे वाचा कौशल्य विकसित करण्यावर भर देणे.
- विविध विषयावर विचार करण्यास प्रवृत्त करणे.
- आपले विचार भाषेद्वारा अभिव्यक्त करण्याची संधी देणे.
- विद्यार्थ्यांमधील विविध गुणांचा शोध घेऊन विकासासाठी प्रयत्न करणे.
- विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी करून समाजात मिसळण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे.
- विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
- विद्यार्थ्यांमधील कौशल्याच्या आधारावर विविध व्यवसाय प्रशिक्षण देऊन स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देणे.
- कला, नाट्य, वाचन, भाषण, व खेळ याद्वारे विदयार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करणे.
उपलब्ध सुविधा
- आल्हाददायक वातावरणाची साऊंड प्रूफ रूम उपलब्ध.
- रम्य परिसर, प्रशस्थ मोठ्या वर्ग खोल्या, मोठे क्रीडांगण.
- खेळाची, व्यायामाची सर्व प्रकारची साधने उपलब्ध. विविध खेळ, स्पर्धांची तयारी करून
- राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सराव.
- प्रशस्त मोठी सर्व सुविधांनी युक्त अशी इमारत.
- ग्रामीण भागातील ४० विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त वसतिगृह-या मुलांसाठी खेळ, करमणूक, व्यायामाची साधने उपलब्ध.
- सर्व साधनांसह प्रयोग शाळा .
- व्यवसायपूर्व प्रशिक्षणात – फाईल मेकिंग, बुकबाईंडिंग, शिवण-विणकाम, हस्तकला या प्रशिक्षणाची सुविधा सर्व साधनांसह उपलब्ध.
- सर्व प्रकारची श्रवण सहाय्य यंत्रे -विद्यार्थ्यांचे श्रवण मापन करून योग्य प्रकारचे श्रवण सहाय्य यंत्र मिळवून देण्याचा प्रयत्न. या शिवाय समूह श्रवण सहाय्य यंत्रे, स्पीच ट्रेनर ही साधने उपलब्ध.
विदयार्थी
शिक्षक
क्लास रूम्स
कर्मचारी
अशी घडतात मुले
प्रार्थना, ओंकार, दीर्घश्व्सन, ध्यानधारणा याने सुरवात केली जाते.
प्रयोगशाळा – पाठ्यक्रमातील विविध प्रयोग स्वतः करून निरीक्षण करण्याची सुविधा यामुळे प्राप्त झाली आहे.
वाचनाचा तास – विविध विषयांची पुस्तके देऊन त्यांचेकडून प्रगत वाचन करून घेतले जाते.
गप्पांचा तास – अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मनातील विषयांवर शिक्षकांशी गप्पा मारणे, यामुळे मुले अत्यंत मोकळेपणाने त्यांच्या मनातील विचार व्यक्त करतात.
पालक – शिक्षक चर्चेतून मुलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न.
डॉ . कलाताई जोशी स्मृति करंडक “राज्यस्तरीय स्पर्धा”
डॉ. कलाताई जोशी यांच्या जयंती निमित्त दरवर्षी २१ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी वाचा कौशल्य व चित्रवाचन स्पर्धांचे आयोजन केले जाते. मुलांना स्वतः विचार करण्यास, बोलण्यास प्रवृत्त करणे व निरीक्षणाच्या आधारे लेखन क्षमतेवर आधारित चित्रवाचन स्पर्धेचे आयोजन केले जाते.
“डॉक्टर कला ताई जोशी स्मृती करंडक राज्यस्तरीय निबंध स्पर्धा” या कार्यक्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थ्यांच्या भाषा वाढीचा तसेच व्यवसाय प्रशिक्षण द्वारा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नवनवीन प्रयोग करतात, उपाय योजतात. त्यांचे प्रयत्न, उपाय सर्वांच्या समोर येऊन त्यांच्या सर्वांना उपयोग व्हावा हे अत्यंत गरजेचे वाटते. त्यासाठी शिक्षकांच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. दरवर्षी 17 एप्रिल रोजी डॉ. कला ताई जोशी पुण्यतिथी निमित्त” डॉ.कलाताई जोशी गौरव पुरस्कार” दिला जातो. ग्रामीण भागातील स्वतःच्या प्रयत्नाने व्यवसाय व्यवसायात यशस्वी झालेल्या गुणी होतकरू मूकबधिर विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो.
निसर्ग निरीक्षण; ऐतिहासिक ठिकाणी योग्य अशा सहली आयोजित करून मुलांच्या निरीक्षणात संधी दिली जाते. विविध ठिकाणच्या वाचा कौशल्य; ओष्ठ वाचन, स्मरणशक्ती भाषा आकलन स्पर्धेसाठी मुलांची तयारी करून घेऊन सहभागाची संधी दिली जाते. खेळ स्पर्धा : जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अपंगांच्या स्पर्धेत मुलांना भाग घेण्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य, प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. सहभाग भाग घेतला जातो. शासकीय चित्रकला परीक्षा, सकाळ चित्रकला परीक्षा स्पर्धा यासाठी मुलांना प्रोत्साहन देऊन तयारी करून घेतली जाते. सकाळ, लोकसत्ता व अन्य वृत्तपत्रांच्या कात्रण स्पर्धेची माहिती पुरवून त्यांना सहभाग दिला जातो. नाट्य स्पर्धा सहभाग : लायन्स क्लब पुणे यांची नाट्य स्पर्धा. नाट्य शाळेची राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा, जिल्हास्तरीय अपंग दिन, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा यासाठी मुलांची अभिनयाची तयारी करून घेऊन संधी दिली जाते.

पुढील योजना- कार्यशाळा
इ. १० वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणाची सोय करणे अत्यंत गरजेचे वाटते. यासाठी प्रौढ मुला-मुलींना, पुनर्वसन होण्यास उपयुक्त अशा, कम्प्युटर, विणकाम, शिवणकाम, होम सायन्स, मोटार रिवाइंडिंग, बुक बाइंडिंग, सुतारकाम आदी विषयातील प्रशिक्षण, कार्यशाळेद्वारा देण्याचा संस्थेचा मानस आहे. या कार्यशाळेसाठी भव्य इमारत उभारणे तसेच वरील प्रशिक्षणासाठी सर्व प्रकारची यंत्रसामग्री उपलब्ध करणे.
-
- विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची व्यवस्था करणे.
- प्रशिक्षित व गरजू विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
- विद्यार्थ्यांना उपयुक्त असे कम्प्युटर्स ,ओव्हर हेड प्रोजेक्टर्स, स्लाईड प्रोजेक्टर, व्ही.सी.आर. इ.शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे.
- प्रत्येक वर्गासाठी ग्रुप हीअरिंग अडमिळवून देणे मिळवून देणे.विद्यार्थ्यांसाठी खेळांच्या साधनांनी युक्त असे गार्डन तयार करणे.
- आपण संस्थेस खालील प्रमाणे मदत करू शकता.
- वसतिगृह मधील एका विद्यार्थ्याच्या भोजनासाठी मासिक रुपये १२०० /- देऊन १ विद्यार्थ्यांचा वर्षभरातील खर्च शैक्षणिक साहित्य सहल कपडे यासाठी रुपये १०००/- देऊन.
- आपल्या वाढदिवसानिमित्त व आपल्या आनंदाच्या प्रसंगी वसतिगृह विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी रुपये ३०००/- ची देणगी देऊन.
- विद्यार्थ्यांसाठी संगणक संच, एल. ईडी टीव्ही ,ई-लर्निंग संच इ. देणगी देऊन.
- विद्यार्थ्यांसाठी बॅटरी, कॉर्ड्स , साहित्य, विद्यार्थ्यांना कपडे ,युनिफॉर्म देऊन
- कार्यशाळेच्या इमारतीसाठी तसेच कार्यशाळेच्या यंत्रसामुग्री साठी निधी देऊन.
- आपल्या व्यवसायात विद्यार्थ्यांना रोजगार देऊन त्यांचे पुनर्वसन करून . विद्यालयाच्या दैनंदिन खर्चासाठी यथाशक्ती देणगी देऊन.
- आपल्या कार्य व वैयक्तिक उपयोगासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फाइल्स वापरून.