जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय
आक्रोश त्यांचा आपल्यापर्यंत न पोहचलेला.
आमची शाळा त्यांच्यासाठी ध्वनीपासून वंचित असलेल्यांसाठी आमचा प्रयत्न ही उणीव भरून काढण्यासाठी हे आवाहन आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी.
आमची शाळा त्यांच्यासाठी ध्वनीपासून वंचित असलेल्यांसाठी आमचा प्रयत्न ही उणीव भरून काढण्यासाठी हे आवाहन आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी.
आमच्याविषयी

अहमदनगर अपंग कल्याणकारी मंडळाच्या आणि पर्यायाने जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा, कै. डॉ. कलाताई जोशी. कर्ण बधिरांच्या मूकपणातील वेदना त्यांना जाणवली. त्या वेदनेचे स्फुलिंग तयार झालं. त्यातून साकारलं,”जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालय”, अहमदनगर जिल्ह्यातली पहिली कर्ण बधीरांसाठीची शाळा.
१९७७ च्या विजया दशमीला,ऑक्टोबर महिन्यात,दोन विदयार्थ्यांसह शाळेला सुरवात झाली. ना पैशाचं पाठबळ, ना कोण्या राजकीय अथवा सामाजिक पुढाऱ्यांचा वरद हस्त. पण,गेल्या २२ वर्षात शाळा सर्वांगानं विकसित झाली ती कलाताईंच साहस, चिकाटी आणि त्यांचा मानव शक्ती वरचा दुर्दम्य विश्वास यामुळे. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हे आमच्या संस्थेचं बोध वाक्य आहे. कलाताई आधी कामाला लागायच्या त्यांचं काम, तळमळ, प्रामाणिकपणा पाहून समाजाचा सर्व प्रकारच्या मदतीचा ओघ सुरु व्हायचा. कलाताईंनी पाया रचून दिला आहे. आता अवकाश गवसणारे विद्यार्थी त्यातून झेप घ्यायला तयार करायचे आहेत. वाटचाल कठीण आहे, पण कलाताईंनी मार्ग दाखवून दिला आहे. त्या मार्गावरून वाटचाल करणं आमचं काम. दानशूर समाज आत्ता पर्यंत पाठीशी उभा आहे. यापुढेही तो तसाच उभा राहील असं काम आमच्या हातुन होईल हे आश्वासनं देतो.
एक विचार … एक वाटचाल
मूक बधीरांच्या जवळ बुद्धिमत्ता असते, ते विचार करू शकतात, कल्पना करू शकतात, फक्त त्यांच्याकडे पुरेसे शब्द, आवाज नसल्याने जगापासून दूर राहतात, काहीसे दुर्लक्षिले जातात. त्यांना आपण मुख्य प्रवाहात आणावयास पाहिजे या विचारातून डॉ. कलाताई जोशी व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर १९७९ रोजी अधिकृतपणे ‘अहमदनगर अपंग कल्याणकारी मंडळाची’ स्थापना केली. जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयाच्या माध्यमातून मूकबधीरांना आवाजाच्या जगात प्रवेशाचा मार्ग उपलब्ध करून दिला.
सुरवातीच्या काळात संस्थेस इमारत, यंत्र सामुग्री व निधी या सर्वच स्तरावर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. डॉ. कलाताई जोशी यांचे अथक प्रयत्न व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर, अडचणींवर मात करून मुलांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

विदयार्थी
शिक्षक
क्लास रूम्स
कर्मचारी